सॉरी टीचर ..CHAPTER- 43

Start from the beginning
                                    

विकी: हो हो ..नक्कीच.

तिघांनी तिला जेवण बाहेर आणण्यास मदत केली. डायनिग टेबलवर बसुन चौघानी स्वादिष्ट रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला.

राहुल: मला वाटतं आपण निघायाला हवं, खुप उशीर झालाय.

विकी: थोडं थांबुया..यार ..मॅडम पण एकट्याच आहेत...तुला काय वाटतं आकाश?

आकाश: इथेच थांबु ..घरी जाऊन तरी काय करणार आहोत, इथे थोडा अभ्यास तरी करू.

राहुल: अरे अजुन किती अभ्यास करणार आहोत.

आकाश: आपल्याला चांगल्या मार्कांने पास व्हायचंय...राईट मॅडम?

सारिका: एकदम बरोबर.

राहुल: मी पास झालो तरी खुप झालं.

सारिका: काय म्हणालास राहुल?? परत बोल एकदा??

राहुल: सॉरी मॅडम, पण मला वाटतं मी जेमतेमच पास होईल.

सारिका: हे खुप चुकीचं आहे..राहुल, प्लिज माझी मेहनत वाया घालवू नका. मला तुम्ही सर्वजण चांगल्या मार्कांनी पास व्हायला हवे आहात. तुम्हाला हॉस्टेल बाहेर आणणे हे पूर्णपणे माझा निर्णय होता. कृपया करून मॅनेजमेंटसमोर माझी मान खाली घालायला लावु नका.

विकी: आम्ही खुप मेहनत घेऊ मॅडम.

आकाश: मी फर्स्ट क्लास मध्ये पास होण्याचा प्रयत्न करेन.

सारिका: सुपर..फक्त पुढचा एक महिना चांगला अभ्यास केला तर तुमचा निकाल सुद्धा चांगलाच लागेल. मला तुमच्या मार्कशीटचा फोटो पाठवा हा..नाहीतर मला विसरून जाल.

विकी: तुम्हाला आम्ही कधीच विसरणार नाही मॅडम.

राहुल: खरं आहे.

आकाश: तुम्ही आणखी एक महिना थांबु शकत नाही का मॅडम?

सारिका: अरे ..तुम्ही सर्व फर्स्ट क्लास मध्ये पास झालात तर तुम्हाला अहमदाबादला बोलवून घेईन. काही दिवस तिकडे मस्त मजा करूया.

विकी: आणि आमच्यापैकी कोणी नापास झालं तर.

सारिका: शक्यच नाही...विकी ..असा नेगेटिव्ह विचार मनात आणायचा नाही. तुम्ही तिघेही बेस्ट फ्रेन्ड आहात. तुमचा पुढचा प्रवास हा एकत्रच झाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमची ही फ्रेंडशिप दीर्घकाळ ठेवायची असेल तुम्ही एकमेकांची मदत घेऊनच पुढे जायचं आहे.

सॉरी टीचर ..Where stories live. Discover now