आह्मी ज्या मार्गाने .गेलों तो मार्ग सर्वांत सुलभ असून त्याजवरील सोयीही चांगल्या आहेत व सरकारी टपालही याचे मार्गाने जाते. करितां प्रथम त्याची विशेष माहिती देऊन नंतर पहिल्या चार मागंची थोडीशी माहिती देऊ. आह्मी घराहून निघून मुंबई, अहमदाबाद, अजमीर, जयपूर, रेवारी, लाहोर या शहरांवरून रावळपिंडीस गेलों. मुंबईहून येथपावेतों सुमारे १,३२९ व मिरजेहून १,६०० मैल आह्मीं लोहमार्गाने प्रवास केला. लाहोर येथे मात्र ते शहर पाहण्या करितां दोन मुक्काम केले. रावळपिंडी येथे पाहण्या सारखी दोन मुख्य स्थळे आहेत, ती आह्मी एक दिवसांत पाहून घेतली. बाकीची शहरे आह्मीं पूर्वीचे प्रवासांत पाहिली होती. असो. रावळपिंडी येथे लोहमार्ग संपला. येथून पुढे मरी नांवांचे गांव ३७ व तेथून बरामुला १२८ व बरामुलाहून श्रीनगर ३४. मैल राहते, झणजे रावळपिडीहून श्रीनगर में सरासरी २०० मैल लांब आहे. रावळपिडी येथून पुढे जाण्यास फैटणी, कुटुंबाचे टांगे, टांगे, एके व बैलगाड्या ही वाहने मिळतात. हंगामाच्या दिवसांत जातां येतां या वाहनास अनुक्रमे ४००, २६०, २००, ४० रुपये पडतात. गैर हंगामाच्या दिवसांत कांहीं कमी घेतात. फैटणींत व कुटुंबाचे टांग्यांत तीन मोठीं मनुष्यें व दोन मुले, टांग्यांत तीन व एक्यांत दोन मनुष्ये बसू देतात. फैटणींत पके बारा, शेर, कुटुंबाचे टांग्यांत एक मण, टांग्यांत दीड मण, व एक्कयांत सव्वा मंण ओझे घेऊ देतात. एकच मनुष्यास जाणे असल्यास रावळपिंडी-
पान:काश्मीर वर्णन.pdf/16
Appearance