Jump to content

पान:काश्मीर वर्णन.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)

संबंधी कांहीं वाद उत्पन्न झाले असतां वरिष्ठ न्यायसभेप्रमाणे त्यांचा अखेर निर्णय करण्याची स्थानें काश्मीर येथील पंडितांच्या परिषद् मुख्य मानिल्या होत्या, असे जैन आणि ब्राह्मण प्रबंध नांवाच्या ग्रंथांत लिहिले आहे. याच संबंधाने बिल्हण कवीची गर्वोक्ति खाली देतों.

सहोदराः कुङ्कुमकेसराणाम् ।
भवन्ति नूनं कविताविलासाः ॥:
न शारदादेशमपास्य दृष्ट-।
स्तेषां यदन्यत्र मया प्ररोहः ॥

 अर्थ-कवितेचे विलास व केशराचे अंकुर काश्मीर देश सीडून दुसरीकडे दिसत नाहीत, करितां कविताविलास हे केंशराच्या अंकुरांचे सहोदर होतात.
 इतकेच नव्हे पण येथील स्त्रियासुद्धां संस्कृत भाषण करीत असत असे विल्हण व दुसरे पंडित ह्मणतात. त्याचप्रमाणे महान् पंडित चंद्रादिस त्याचे पुत्र कय्यट, जय्यट, उब्वट (?) व यांचा मातुल मम्मट हे प्रख्यात पंडित असून त्यांनी अनुक्रमें केलेले भाष्यप्रदीप, उद्योत, यजुर्वेदसंहिताभाष्य व काव्यप्रकाश हे ग्रंथ सर्वमान्य व सर्वप्रसिद्ध आहेत. तसेच अद्वैतब्रह्मसिद्धीचे कर्ते सदानंदयति, अलंकारदेवीस्तोत्राचे कर्ते यशस्कर, काशिकावृत्तीचे कर्ते जिनेंद्रबुध, हर्षचारताचे कर्ते बाणभट्ट, कथासरित्सागराचे कर्ते सोमदेव, माघ, रघू, कुमारसंभव व मेघदूत यांजवरीलं टीकाकार व सुभाषितावली ग्रंथाचा कर्ता वल्लभदेव, यांशिवाय चंद्र, अमृतभानु, याचा पुत्र चंद्रक, भर्तृमेंठ, अभिनंद, वामन, दामोदर, उद्भट, मुक्ताकण, शिवस्वामी, आनंदवर्धन, रत्नाकर,