जानेवारी १४
Appearance
(१४ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४ वा किंवा लीप वर्षात १४ वा दिवस असतो.
भारतात १४ जानेवारी हा दिवस इ.स.१९९६ पासून भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो
ठळक घटना
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]१७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. दुसऱ्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलून गेला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८५७ - इंग्लंडच्या राजाने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात मिळालेली लूट ठेवून घेण्याची मुभा दिली.
विसावे शतक
[संपादन]- १९२३ - विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
- १९४८ - लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
- १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
- १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहीर.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान.
- २००४ - जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वजला पाचशे वर्षांनंतर पुन्हा अधिकृत ध्वजाचे स्थान देण्यात आले.
- २००५ - शनीच्या उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.
जन्म
[संपादन]- १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र.
- १८९२ - क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर शतायुषी क्रिकेट खेळाडू.
- १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री. भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर
- १९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
- १९०८ - द्वा.भ. कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.
- १९१९ - सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी, गीतकार
- १९२३ - चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते.
- १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.
- १९३१ - सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज’, ऊर्दू शायर.
- १९७७ - नारायण कार्तिकेयन, भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग चालक.
मृत्यू
[संपादन]- ११६३ - लाडिस्लॉस दुसरा, हंगेरीचा राजा.
- १२३५ - संत सावा, सर्बियाचा संत.
- १३०१ - अँड्रू तिसरा, हंगेरीचा राजा.
- १७४२ - एडमंड हॅले, ब्रिटिश अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १७४२ - लुईस कॅरोल, इंग्लिश लेखक व गणितज्ञ.
- १७६१ - विश्वासराव पेशवे, पानिपतच्या ३ऱ्या लढाईत मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र.
- १७६१ - सदाशिवराव भाऊ, मराठा सेनापती.
- १८६७ - ज्याँ ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.
- १९०५ - अर्न्स्ट ऍबी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०७ - सर जेम्स फर्गसन, ब्रिटिश राजकारणी, मुंबई, दक्षिण ऑस्ट्रेलिया व न्यूझीलॅंडचा गव्हर्नर.
- १९२० - जॉन फ्रांसिस डॉज, अमेरिकन कार उद्योगपती.
- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.
- १९५७ - हंफ्री बोगार्ट, अमेरिकन अभिनेता.
- १९७२ - फ्रेडरिक नववा, डेन्मार्कचा राजा.
- १९७६ - तुन अब्दुल रझाक, मलेशियाचा दुसरा पंतप्रधान.
- १९७७ - ॲंथोनी इडन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९८४ - रे क्रॉक, अमेरिकन झटपट-खाद्यपदार्थ उद्योगपती.
- १९९१ - चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त संगीतकार.
- २००१ - बुर्कहार्ड हाइम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००१ - फली बिलिमोरिया, भारतीय माहितीपट निर्माते.
- २०१३ - जसुबेन शिल्पी, भारतीयशिल्पकार.
- २०१४ - पं. पुरुषोत्तम वालावलकर, भारतीय हार्मोनियमवादक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- मकरसंक्रांत, उत्तरायण - भारत
- भूगोल दिन
- आर्मी दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |