Jump to content

हिडिंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिडींबा या पानावरून पुनर्निर्देशित)

हिडिंबा ही महाभारतात वर्णिलेली एक राक्षसी होती. महाभारतातील वर्णनानुसार कौरवांनी पांडवांना जाळण्यासाठी केलेल्या खांडववन दहनाच्या कारस्थानानंतर पांडव वनांतून भटकत असतानाभीमाची हिच्याशी गाठ पडली. भीमावर हिचा जीव जडल्यावर हिने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा दाखवली. हिडिंबेच्या आग्रहाला मान्यता देऊन भीमाने अपत्यप्राप्तीपर्यंत तिच्यासमवेत दिवसभर राहून रात्री पुन्हा भावांसोबत राहण्याचे आश्वासन दिले. भीमापासून हिडिंबेला घटोत्कच नावाचा पुत्र झाला.

संकीर्ण

[संपादन]
मनाली येथील हिडिबेचे मंदिर

हिडिंबेला काही ठिकाणी, विशेषतः भारतातील हिमाचल प्रदेशात देवीप्रमाणे पुजले जाते. मनाली येथे हिडिंबेचे एक मंदिरही आहे.