Jump to content

सेतू भारतम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेतू भारतम् या पानावरून पुनर्निर्देशित)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ मार्च २०१६ रोजी सेतु भारतम या प्रकल्पाचे विमोचन केले. या योजनेसाठी १०,२००कोटी रुपये इतकी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश सन २०१९ पर्यंत भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या वाहतुकीत रेल्वे क्रॉसिंगचे अडथळे दूर करणे हा आहे.[]

प्रकल्पाचा तपशील

[संपादन]

या प्रकल्पांतर्गत,राष्ट्रीय महामार्गांवरील रेल्वेच्या निर्मनुष्य फाटकांच्या जागी सुमारे २०८ रेल्वे ओव्हरब्रिज वा अंडर ब्रिजेसची बांधणी हॊणार आहे. त्यावेळी, मुदत पार केलेल्या १५०० ब्रिटिशकालीन पुलांची पुनर्बांधणी करण्यात येईल, व ते रुंद करण्यात येतील. तसे करणे अवघड असेल तर त्यांची जागा बदलण्यात यईल किंवा त्याजागी पर्यायी पूल बांधण्यात येतील. .हे काम क्रमाक्रमाने हाती घेण्यात येईल.त्यासाठी अनुक्रमे २०,८०० कोटी. ३०,०००कोठी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे..[][]

सेतु भारतम् प्रकल्पामुळे सन २०१९ पर्यंत रेल्वेची सर्व फाटके राष्ट्रीय महामार्गांवरून हटतील. हा सर्व खटाटोप रेल्वे क्राॅसिंग्जवर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या व जीव गमावण्याच्या घटना टाळण्यासाठी करण्यात येणार आहे. रेल्वे मार्गास वरून पार करणारे/ खालचे बाजूने पार करणाऱ्या २०८ पुलांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

  • आंध्र प्रदेश – ३३,
  • आसाम – १२,
  • उत्तर प्रदेश – ९,
  • उत्तराखंड – २,
  • ओडिशा – ४,
  • कर्नाटक – १७,
  • केरळ – ४,
  • गुजरात – ८,
  • छत्तीसगढ – ५,
  • झारखंड – ११,
  • तामिळनाडू – ९,
  • पंजाब – १०,
  • पश्चिम बंगाल – २२
  • बिहार – २०,
  • मध्य प्रदेश -६,
  • महाराष्ट्र – १२,
  • राजस्थान – ९,
  • हरयाणा – १०,
  • हिमाचल प्रदेश – ५,

[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [झी न्यूझचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) "पं. नरेंद्र मोदींनी सेतू भारतम् प्रकल्प विमोचित केला, भारतातील रस्ता वाहतूक चांगली करण्याचा उद्देश"] Check |url= value (सहाय्य), झी न्यूझ, २ मार्च २०१६
  2. ^ [फिनॅन्शियल एक्स्प्रेसचे संकेतस्थळ "नरेंद्र मोदी म्हणतात,आधारभूत संरचनेत झेप घेण्यास भारत तयार"] Check |url= value (सहाय्य), The Financial Express
  3. ^ [एकॉनॉमिक टाईम्सचे संकेतस्थळ "सेतु भारतम् प्रकल्प शुक्रवारी सुरू करण्यात येईल"] Check |url= value (सहाय्य), द इकोनॉमिक टाइम्स
  4. ^ Firstpost. "५०,८०० कोटी खर्चाचा सेतु भारतम् प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमोचित केला ते म्हणतात-आधारभूत संरचनेत झेप घेण्यास भारत तयार". Firstpost.
  5. ^ "सेतु भारतम् प्रकल्प पंतप्रधानांनी विमोचित केला".