सुकन्या समृद्धी खाते
सुकन्या समृद्धी योजना किंवा सुकन्या समृद्धी खाते ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविल्या जात असलेली एक योजना आहे. या योजनेस भारत सरकारचे पाठबळ आहे. ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्या मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी प्रोत्साहन देते.[१]
या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे दि. २२ जानेवारी २०१५ला उद्घाटन केले गेले. सध्या या योजनेवर मिळणारे व्याज हे ८.६% (आर्थिक वर्ष २०१६-१७साठी) इतके आहे. या योजनेत करलाभपण आहे. हे खाते कोणत्याही डाक कार्यालयात किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत उघडल्या जाऊ शकते.[२]
योजनेची वैशिष्ट्ये
१) या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात 'सुकन्या समृद्धी' खाते उघडता येते, यात किमान १०००रु. ठेवावे लागतात. एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल १.५ लाख रु टाकता येतात.
२) खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास (जी मुदत आधी असेल ती) व्याजासह ठेव परत मिळते.
३) १८ वर्षे वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची मुदत असते. उर्वरित रक्कम पुढे केव्हाही (२१ वर्षे मुदत संपेपर्यंत) काढता येईल
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "Small savings: Girl, uninterrupted". The Financial Express (India). 30 March 2015. 2 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Sukanya Samriddhi to earn at 9.2% interest, PPF 8.7% for FY16". 31 March 2015.