संत
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
संत या शब्दाचा धात्वर्थ सद्वस्तू असा आहे. तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. देहाहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व होय. साधू, संतसज्जन आणि भगवद्भक्त हे साधारणपणे एकच असतात. भगवद्गीतेमधील दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ, सहाव्या अध्यायातील योगी, बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त, चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील कर्मसंन्यासी, हे सर्व एकच. ब्रह्मनिष्ठ किंवा ईश्वरभावाला प्राप्त झालेल्या विभूतींची नावे जरी भिन्न असली तरी वृत्ती सारखीच असते. भागवतात अशा महात्म्यांना "भागवत" किंवा भागवतोत्तम संत असे म्हणतात. हे भागवतोत्तम सत्पुरुष समदर्शी असतात. सम याचा एक अर्थ व्यावहारिकाच्या म्हणजे उपाधीच्या पलीकडचा, तर सम शब्दाचा दुसरा अर्थ ब्रह्म म्हणजेच सर्वच ब्रह्म किंवा ईश्वर पाहणारा, असा आहे. मुण्डकोपनिषदात "श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं" अशी सन्तांची लक्षणे सांगितली आहेत. श्रुतिसम्पन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याबरोबरच कृपाळूपणा हा ससंतांचामहत्त्वाचा गुण. श्रुतिसम्पन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले ससंतकृपेचा वर्षाव करतात.
संताची अभंगवाणी हे महाराष्ट्राचे आणि मराठीचे परमभूषण आहे. संताची अभंगवाणी हे महाराष्ट्राच्या मराठी भाषेचे अक्षर लेणे होय.
साधुसंत मायबाप
तिंही केले कृपादान ।
पण्ढरिये यात्रे नेले
घडले चंद्रभागे स्नान ।।
आणि संतकृपेनेच ही भूलोकीच्या वैकुण्ठाची वाट गवसते.
ख्रिश्चन धर्मातील संतपदे
[संपादन]महाराष्ट्रात संतपरंपरेमध्ये चमत्काराला नकार देणारी आणि मानवतेच्या सेवेला खरे संतत्त्व मानणारी 'जे का रंजले गांजले' म्हणणारे संत तुकाराम, तसेच तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशी मोठी परंपरा आहे. युरोपात पाहिले तरी चमत्काराला आव्हान देणारी प्रबोधनाची प्रचंड मोठीच परंपरा तेथे आहे. गॅलिलिओला दिलेल्या शिक्षेबद्दल तीनशे वर्षांनी का होईना माफी मागून सत्यशोधनाविषयी आस्था दाखवण्याचे धारिष्ट्य तेथे दाखवण्यात आले.
असे असले तरी ख्रिश्चन धर्मात संतपद देण्यासाठी चमत्काराची अट ठेवली आहे.
मदर तेरेसा आणि संतपद
[संपादन]मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. 'मोनिका बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन ह्या दाव्यातील वास्तव समजून घेतले, तर अनेक गोष्टी लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते की प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 'महा. अंनिस'ने ह्या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता आणि वास्तव समाजापुढे ठेवले होते. आत्ता देखील त्याच पद्धतीने, २००८ मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी बऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याला नक्की कोणता आजार होता, प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते, यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही.
चमत्काराने आजार बरे होण्यातला धोका
[संपादन]कर्करोगासारखे आजार हे चमत्काराने बरे होतात, असा समज लोकांमध्ये पसरणे हे अतिशय गम्भीर आहे. असे समज जेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या नावाने पसरवले जातात, तेव्हा ते समज ह्या व्यक्तींना शास्त्रीय उपचारांच्या पासून दूर नेणारे आणि त्यामुळेच हानिकारक देखील ठरू शकतात. म्हणून एखाद्या व्यक्तीला 'संत' जाहीर करण्यासाठी चमत्कारांची अट ही केवळ विज्ञान विरोधीच नाही, तर लोकांच्या शोषणाला देखील कारणीभूत ठरू शकणारी आहे. संत हे मानव समाजास उपकारक काम करतात
संत विषयावरची पुस्तके
- आधुनिक संत (बालसाहित्य, डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर)
- आपले संत (अरुण गोखले)
- १०१ संतवचने - भाग : १, २. (शीला निपुणगे)
- कलियुगातले संत भाग १ ते ४. (शंकर पाण्डुरंग गुणाजी)
- जाईं सन्ताचिया गांवा (शीला निपुणगे)
- तुकाराम दर्शन (सदानन्द मोरे)
- पाच संत चरित्रे - ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास, नामदेव. (गो.नी. दाण्डेकर)
- भक्तिकोश : भारतीय संत (दोन खण्ड; हिंदी-मराठी)- लेखक : शंकर अभ्यंकर
- भारतीय सन्त (दिनेश काळे)
- भारतीय स्त्री संत, रत्ने (सुमती अरकडी)
- मराठी संतकवयित्री (प्राचार्य मा.के. यादव)
- मराठी संतवाणीचे मन्त्राक्षरत्व (ह.श्री. शेणोलीकर]]
- महाराष्ट्राचा भागवतधर्म ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. शं. दा. पेण्डसे)
- महाराष्ट्रातील संत कवयित्री (प्रा. आरती दातार)
- महाराष्ट्रातील संत कवी (प्रा. आरती दातार)
- महाराष्ट्रीय संतमण्डळीचे ऐतिहासिक कार्य (गं.बा. सुण्ठणकर)
- भक्तीचा ध्वज उभारणाऱ्या महिला संत (विजय यंगलवार)
- वारी एक आनन्दयात्रा (सन्देश भण्डारे)
- संत आणि सायन्स (प्रा. मा.का. देशपाण्डे)
- संतकृपा (कादम्बरी, सुमन भडभडे )
- श्री संत गाथा (त्र्यम्बक हरि आपटे). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
- श्री संतगाथा (साखरे महाराज)
- संत चरित्रमाला संच (लीला पाटील) : (संत चोखा मेळा, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत गोरा कुम्भार व इतर , महायोगिनी बहिणाबाई, एकनाथ, भागवतधर्मी संत नामदेव आणि संत रामदास यांची लघुचरित्रे)
- संतचरित्रे (दिलीप गोगटे)
- संतदर्शन चरित्रग्रन्थ संच (१३ पुस्तके, सम्पादन- डॉ. सदानन्द मोरे, अभय टिळक), श्री गन्धर्ववेद प्रकाशन (पुणे).
- संत, लोक आणि अभिजन (डॉ. रा.चिं. ढेरे
- संत वचन सुधा (ज्ञानेश्वर, निळोबा, एकनाथ, नामदेव, जनाबाई, तुकाराम इत्यादी सन्तांच्या निवडक अभंगांचा संग्रह अभंगसूची व कठिण शब्दांच्या कोशासह) - वरदा प्रकाशन (पुणे). (सम्पादन बहुधा ल.रा. पांगारकर)
- संत-संकीर्तन (हे.वि. इनामदार)
- संतसाहित्य : काही अनुबन्ध (डॉ. अशोक कामत)
- संत साहित्य : संदर्भ कोश (अनेक खण्ड, डॉ. मु.श्री. कानडे
- संतसाहित्य नवचिन्तन (डॉ.यू. म. पठाण)
- संतसाहित्य : शोध आणि बोध (डॉ.यू. म. पठाण)
- संत साहित्यातील बण्डखोरी (डाॅ. कल्पना बोरकर); विजय प्रकाशन (नागपूर).
- संत सुभाषित कोश - सन्त ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम (रा.शं. नगरकर)
- सन्तांची अमृतवाणी (१० भाग, सम्पादक - ह.अ. भावे
- सन्तांचा प्रसाद (विनोबा भावे)
- सन्तांची मान्दियाळी (संकलक - मुक्ता केणेकर. ‘सन्तांची मान्दियाळी’ या उपक्रमाच्या व्याख्यानमालेतील निवडक व्याख्यानांचे संकलन)
- सन्तांचे आन्दोलन (प्रा. गौतम निकम)
- सन्ताचे भक्तिवैभव (नारायण कदम)
- सन्तांच्या अम्लान कथा (ललित लेख, प्रा. माधव ना. आचार्य)
- साधू व सन्त (डॉ. प्र. न. जोशी)
सन्तदर्शन चरित्रग्रन्थ संचातली पुस्तके
[संपादन]- काळजयी कबीर (अंशुमनी दुनाखे) : सन्त कबीर यांच्यावरील लिहिलेला चरित्रग्रन्थ.
- चार भावंडे (डॉ. सदानन्द मोरे) : ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांवर आधारित पुस्तक. लेखकाने या पुस्तकात या चार अलौकिक सन्तांच्या कार्यकर्तृत्वाचे विस्तृत आणि मूलगामी चिन्तन मांडले आहे. ज्ञानदेवांच्या काळातील राजकीय, सामाजिक परिस्थिती, धर्मकारण, प्रथा परम्परा, लोकव्यवहार, अन्य उपासना, सम्प्रदाय, त्यांच्यातील अनुबन्ध, वादविवाद, आक्षेप यांचा चिकित्सक आढावा तर पुस्तकात घेतला आहेच; शिवाय त्यांच्या जीवन चरित्रांतील प्रत्येक घटनेचं विश्लेषण करताना अनेक महत्त्वाच्या ग्रन्थांचा संदर्भ देत अनेक वादग्रस्त मुद्दय़ांचे तर्कशुद्ध खण्डनही केले आहे. त्यांचे हे सारभूत लेखन वाचकांचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणारे आहे.
- तुकाराम महाराजांचा शिष्यपरिवार (शोभा घोलप) : तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडून त्यांच्या वाङ्मयाचे जीवावर उदार होऊन जतन करणाऱ्या सन्ताजी जगनाडे, तुकयाबन्धु कान्होबा, सन्त नारायण महाराज, कचेश्वर आणि रामेश्वरभट वाघोलीकर यांची चरित्रे व त्यांची काव्याबद्दलची दुर्मीळ माहिती या ग्रन्थात आली आहे.
- नामदेवांची प्रभावळ (शिवाजीराव मोहिते) या पुस्तकात संत गोरा कुम्भार, राका कुुुम्भार, परिसा भागवत, नरहरि सोनार, जोगा परमानन्द, जगन्मित्र नागा नामदेवांच्या कुटुम्बातील सदस्य यांच्या चरित्र आणि अभंग सम्पदेविषयीची दुर्मीळ माहिती मिळते.
- बहिणी फडकती ध्वजा (रुपाली शिन्दे) : वारकरी सम्प्रदायात सन्त बहिणाबाईंच्याविषयी व त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक. तत्कालीन सामाजिक बन्धन आणि रूढींना टक्कर देत परमार्थ साधताना स्त्री म्हणून करावा लागलेला संघर्ष बहिणाबाईंच्या आत्मचरित्रपर अभंगांत दिसून येतो, त्याचा अभ्यासू आढावा या पुस्तकात आहे.
- भाग्य आम्ही तुका देखियला (अभय टिळक).
- मंगळवेढय़ाची मान्दियाळी (अप्पासाहेब पुजारी) या चरित्रग्रन्थात सन्त कान्होपात्रा, कर्ममेळा, निर्मळा, बंका, दामाजीपन्त यांच्या दुर्मीळ चरित्र-काव्याचा विस्तृतपणे परिचय होतो.
- सन्त शेख महम्मद महाराज (अनिल सहस्रबुद्धे). या ग्रन्थात भागवत धर्म आणि मुस्लिम सूफी तत्त्वज्ञान यांचा महासमन्वय घडवून आणण्याचे लोकोत्तर कार्य करणाऱ्या शेख महम्मदांची अत्यन्त प्रतिभासम्पन्न आणि विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेली काव्यसम्पदा वर्णन केली आहे. ग्रन्थात त्यांचे असामान्य कार्य आणि काव्यरचनांचा विस्तृत आढावा घेतला आहे. शेख महम्मदांनी भागवत परम्परेतील भक्तीचा प्रसार करण्यासाठी स्वीकारलेला कीर्तनाचा मार्ग, त्यासाठी केलेली भ्रमन्ती, अभंग आणि लोकरूपकांची रचना यांविषयीची माहिती पुस्तकात आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- http://santeknath.org/home.html Archived 2013-06-14 at the Wayback Machine.