Jump to content

शुभेच्छा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुभेच्छा[] म्हणजे शुभ इच्छा. ज्याला शुभेच्छा देत आहोत त्याच्या हिताची कामना करणे.  उदा.[] माझी शुभेच्छा आहे की तुम्ही सर्व सुखी रहा. तुमचा दिवस शुभ असावा.

शुभेच्छा ह्या सणाच्या, वाढदिवसाच्या किव्हा विवाहाच्या देखील असू शकतात. सण आणि वाढदिवस हे वर्षातून एकदाच येणारे विशेष असे दिवस असल्याने या दिवशी आपण आपल्या जवळच्या माणसांना तो दिवस आनंददायक जावा अश्या शुभेच्छा देतो.

नवीन विवाह झालेल्या जोडप्यांना त्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात आनंदाने करण्यासाठी आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा अश्या शुभेच्छा दिल्या जातात.

शुभेच्छा दिल्याने त्या दिवसाचा आनंद द्विगुणित होतो आणि ज्याला शुभेच्छा देत आहोत त्या व्यक्तीबद्दलचा आपला आदर आणि प्रेमही ही व्यक्त होते.

आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना विशेष असे महत्त्व आहे, आणि जर आपण कॅलेंडर पाहिले तर असे दिसते की प्रत्येक आठवड्याला एक मोठा सण हा आहेच. प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. एकादशी, चतुर्थी, रोज कोणाना कोणा महान व्यक्तीची जयंती, राष्ट्रीय दिवस आणि इतर बरेच महत्त्वाचे दिवस.

म्हणूनच एकमेकांना शुभेच्छा देणे हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे.

शुभेच्छा देण्याच्या पद्धती

[संपादन]

शुभेच्छा ह्या प्रसंगानुरूप आणि विशेष वेळेनुसार बदलत जातात. उदा. प्रसंग जर एखाद्या स्पर्धा परीक्षेचा असेल तर त्या व्यक्तीला परीक्षेत उत्तम यश मिळावे अश्या शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या दिल्या जाणाऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि वेळेनुसार म्हंटले तर पहाटेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सकाळच्या शुभेच्छा आणि रात्रीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या शुभ रात्री शुभेच्छा. सोमवारी दिल्या जाणाऱ्या शुभ सोमवार अश्या शुभेच्छा.

आजकाल तर वयानुसार देखील शुभेच्छा दिल्या जातात. जसे की, वयाची 60 वर्षे पूर्ण केल्याबद्दलच्या शुभेच्छा, 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अश्या वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते व्यक्ती म्हातारा होईपर्यंत शुभेच्छा ह्या संपत नाहीत.

वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नमुना:

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे !

यशस्वी व्हा, औक्षवंत व्हा,

याच सदिच्छेसह..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "What is the meaning of Marathi word शुभेच्छा (Shubheccha)? - Quora". www.quora.com. 2020-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ "शुभेच्छा meaning in English and Hindi, Meaning of शुभेच्छा in English : Aamboli Dictionary". www.aamboli.com. 2021-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-06 रोजी पाहिले.