वैकुंठ
वैकुंठ वा वैकुंठ धाम (IAST: Vaikuṇṭha ,संस्कृत: वैकुण्ठ) वैकुंठलोक,विष्णूलोक, परम पदम, नित्य विभूति किंवा वैकुंठ सागर श्रीलक्ष्मीनारायणाचे वास्तविक निवासस्थान आहे. सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गासारखे निवासस्थान आहे, सर्वोत्तम निवासस्थान मानले जाते. ज्या स्वर्गीय जगामध्ये पालनकर्ता श्रीविष्णू क्षीरमहासागर शेषनागावर लक्ष्मीसह निवास करतात.
शांति, प्रेम, पुण्य, शुद्धता, संयम, दान, परिश्रम, धैर्य, दया आणि नम्रता व आनंदाचे स्थान आहे. पुण्याद्वारे माणसाला या जगात स्थान मिळते. जो येथे पोचतो तो गर्भात परत येणार नाही, कारण त्याला तारण प्राप्त झाले आहे. अध्यात्माच्या दृष्टीने वैकुंठलोक मन वा चेतनाची स्थान आहे.
मोक्ष, पुण्य करणारे लोक वैकुंठातच राहतात. एक शाश्वत दैवीय अविनाशी प्रकाशमान जग आहे. सर्व काही फळझाड, फुल, प्राणी, पक्षी, गाय, जलचर, समुद्र अनंत आहे.
रामानुजांच्या मते, परम पदम किंवा नित्य विभूती हे एक चिरंतन स्वर्गीय क्षेत्र आहे आणि ईश्वरीय अविनाशी जग आहे जे देवाचे निवासस्थान आहे, ते सर्व जगांपेक्षा उच्च स्थान आहे आणि त्यापलीकडे काहीही नाही.[१] जय-विजय हे विष्णूंच्या निवासस्थानाचा प्रवेशद्वराचे संरक्षक द्वारपाल आहे.[२]
श्लोक
[संपादन]भागवत पुराण वा ऋग्वेदः सूक्तं १.२२| अथर्ववेदसंहिता भाग २ मध्ये वर्णन, तद् विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः।[३][४]
अर्थ आणि नाव
[संपादन]वैकुण्ठ शब्दाचा अर्थ जहा कुंठा न हो, दुःख, निराशा, आळस आणि दारिद्र्य नाहीत.[५]
साकेत, गोलोका, परमधाम, परमस्थान, परमपद, परमवायम, सनातन आकाश, सत्त्व-पद, ब्रह्मपूर नावे आहे.
हिंदू धार्मिक पौराणिक कथेनुसार वर्णन
[संपादन]देवी लक्ष्मी प्रभूच्या विष्णूच्या कमलशरणाजवळ प्रेमळ सेवा करत असते. वैकुंठ लोक संबंधित धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक पैलूंबद्दल सांगणार आहोत -
धार्मिक दृष्टिकोन - साध्या शब्दांत सांगायचे झाले तर वैकुंठ धाम हे विष्णूचे निवासस्थान आहे. जसे कैलासवरील महादेव आणि ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये राहतात. विष्णूंचे निवासस्थान असलेले वैकुंठ अत्यंत दिव्य आहेत. वैकुंठ धाम जागरूक, आत्म-प्रकाशमय आहे. याची अनेक नावे आहेत- साकेत, गोलोका, परमधाम, परमस्थान, परमपद, परमवायम, सनातन आकाश, सत्त्व-पद, ब्रह्मपूर. धार्मिक विश्वास असा आहे की पृथ्वीवरील सर्वात मोठे आनंद म्हणजे वैकुंठातील सर्वात कमी आनंद होय. यातून आपण वैकुंठधामचे सर्वात मोठे आनंद कोणते असेल याचा विचार करू शकतो. अशा प्रकारे वैकुंठ हे परम आनंदाचे माहेरघर आहे.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Vaikuntha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-02.
- ^ "Jaya-Vijaya". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-25.
- ^ "ऋग्वेदः सूक्तं १.२२ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-04 रोजी पाहिले.
- ^ "पृष्ठम्:अथर्ववेदसंहिता-भागः २.pdf/३७१ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-04 रोजी पाहिले.
- ^ "बैकुण्ठ". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2018-06-28.
- ^ "Vaikuntha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-20.
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |