महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादी
Appearance
(महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्रच्या विधानसभेसाठी २८८ मतदारसंघ आहेत. २००८ पासून विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमन झाल्यापासून हे अस्तित्वात आहे. भारताचे सध्याचे महाराष्ट्र राज्य हे १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या २६४ होती. ३३ मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होते आणि १४ जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या. २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी खालीलप्रमाणे आहे. सध्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी २९ मतदारसंघ राखीव आहेत आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी २५ मतदारसंघ राखीव आहेत.