Jump to content

महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गडचिरोलीच्या महात्मा फुले-आंबेडकर विचारमंचाने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलन भरवले होते.

या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. भाऊ लोखंडे होते.

२रे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्षाच्या निमित्ताने भोर येथे २६ व २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरले होते. भोर येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भोर येथील शाखा, अनंतराव थोपटे विद्यालय आणि समविचारी संस्था व संघटना यांच्या विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले.


हे सुद्धा पहा

[संपादन]