पूर्वाषाढा
पूर्वाषाढा हे एक नक्षत्र आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]भारतीय नक्षत्रमालिकेतील विसावे नक्षत्र. वृश्चिक तारकासमूहाच्या नांगीच्या टोकाशी हे दिसते, यात तीन वा चार तारे मानतात. याचा अंतर्भाव धनू राशीत असून धनूमधील डेल्टा, गॅमा, लॅंब्डा व एप्सायलॉन हे तारे यात अंतर्भूत आहेत. यांपैकी डेल्टा [ कॉस मीडिया ; विषुवांश १८ ता. १७ मि. ३९.८ से., क्रांती - २९° ५१' ७".७, प्रत २.८ ; ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति ; प्रत] हा योगतारा (प्रमुख तारा) आहे. एप्सायलॉन (कॉस ऑस्ट्रॅलिस; विषुवांश १८ ता. २० मि. ४३.२ से., क्रांती - ३४° २४' ४०".३, प्रत १.९) व लॅंब्डा (कॉस बोरिअलिस ; विषुवांश १८ ता. २४ मि. ४५.६ से., क्रांती - २५° २७' ८".१, प्रत २.९) हे उल्लेखनीय आहेत. या नक्षत्राचा उल्लेख अथर्ववेदात आला असून याची देवता आप व आकृती शय्या आहे. हे नक्षत्र सप्टेंबरमध्ये रात्री ९ च्या सुमारास डोक्यावर दिसते.
ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)