पिंपरी-चिंचवड
?पिंपरी चिंचवड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी ५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५६० मी |
जिल्हा | पुणे |
लोकसंख्या | १७,२९,३२० (2011) |
महापौर | श्री. नितीन काळजे |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४११००१ • ०२० • MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ] |
संकेतस्थळ: पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ |
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय ने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस दापोडी तर उत्तरेस आकुर्डीही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ची लोकसंख्या १७ लाख होती.ह्याला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा असेही म्हणले जाते.
भूगोल
[संपादन]पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.
पिंपरी-चिंचवडमधील नद्यांवरचे घाट
[संपादन]- किवळे घाट
- पिंपरी झुलेलाल मंदिर घाट
- थेरगाव पूल घाट
- थेरगाव बोट क्लब
- पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट
- मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट
- रहाटणी राममंदिर घाट
- पिंपरी वाघेरे घाट (एक वेगळाच डोंगरी वाघेरे घाट नाशिक-हर्सूल रस्त्त्यावर आहे)
- वाल्हेकरवाडी घाट
- सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट
- पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट
- पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट
- काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट
- कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट
- थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट
- पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट
- सांगवी स्मशानभूमीजवळील घाट
पेठा
[संपादन]उपनगरे
[संपादन]- आकुर्डी
- चिंचवड
- तुकारामनगर
- थेरगाव
- निगडी
- नेहरूनगर
- पिंपळे गुरव
- पिंपळे निलख
- पिंपळे सौदागर
- भोसरी
- संभाजीनगर
- सांगवी (जुनी आणि नवी)
- यमुनानगर
- रहाटणी
- रावेत
- रूपीनगर
- वाकड
- हिंजवडी(हिंजवडी सद्ध्या स्वतंत्र ग्रांमपंचायत आहे , लवकरच पिंपरी चिंचवड महानगर पालिके मधे येणार आहे.)
सार्वजनिक वाहतूक सेवा
[संपादन]रेल्वे स्थानके : दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी
एस.टी. बस स्थानक: वल्लभनगर एस.टी. बस स्थानक
एस.टी. बस थांबे: चिंचवड स्टेशन, निगडी
पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस स्थानके: निगडी, चिंचवड, भोसरी, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी, आकुर्डी, पिंपळे निलख, किवळे
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बीआरटी मार्ग:
- सांगवी फाटा ते मुकई चौक, किवळे (कार्यरत)
- नाशिक फाटा ते वाकड फाटा (निर्माणाधीन)
- काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता (निर्माणाधीन)
- दापोडी ते निगडी (कार्यरत)
- हिंजवडी ते कोथरुड (निर्माणाधीन)
- लोणावळा ते निगडी (निर्माणाधीन)
येथे एक रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहे ज्यामुळे पिंपरी-चिंचवडला नवी ओळख मिळेल व पुर्ण भारताशी शहर रेल्वे वाहतुकीने जोडले जाईल आणि व्यापाराला चालना मिळेल तसेच त्याला पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार स्व.प्रा.रामकृष्ण मोरे,माजी शालेय शिक्षणमंत्री(महाराष्ट्र शासन) ह्यांचे नाव दिले जावे अशी मागणी आहे.[ संदर्भ हवा ]
पुस्तके
[संपादन]पिंपरी चिंचवडची माहिती देणारी फारच थोडी पुस्तके आहेत. त्यांतले हे एक : -
- पिंपरी-चिंचवड (श्रीकांत चौगुले)
- उद्योगनगरी (रमाकांत गायकवाड)
- उपमुख्यमंत्री आणि पिंपरी चिंचवड
- पिंपरी चिंचवड शहराचा ५० वर्षांचा इतिहास ( विजय जगताप)