पालियो दि सियेना
Appearance
horse race | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | Palio | ||
---|---|---|---|
उपवर्ग | horse race | ||
स्थान | piazza del Campo, सियेना, सिएना प्रांत, तोस्काना, इटली | ||
Organizer | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
पालियो दि सिएना ही इटलीच्या सिएना शहरात वर्षातून दोनदा भरणारी घोड्यांची शर्यत आहे. ही शर्यत दरवर्षी दोनदा, २ जुलै आणि १६ ऑगस्ट रोजी आयोजित केली जाते. यांत जीन आणि रिकीब नसलेल्या दहा घोड्यांवर आपापल्या संघाचे रंगीबेरंगी कपडे घातलेले स्वार भाग घेतात. ही शर्यत १६३३ पासून दरवर्षी होत आहे. यापूर्वी १४व्या शतकापासून या शर्यतीचे अनेक वर्षे आयोजन झाले. यांतील २ जुलैच्या स्पर्धेला पालियो दि प्रोव्हेंझानो आणि १६ ऑगस्टच्या शर्यतीला पालियो देलासुंता असे नाव आहे.
या स्पर्धेतील १० स्वार सिएना शहरातील १७पैकी १० प्रभागांचे प्रतिनिधत्व करतात. हे प्रभाग मागच्या वर्षी भाग न घेतलेले ७ आणि चिठ्ठ्या टाकून निवडलेले इतर ३ संघ असतात.[१]
या शर्यतीआधी कोर्तेओ स्तोरिको ही मिरवणूक शहरातून निघते.
संदर्भ
[संपादन]- ^ "Archivio del Palio di Siena". Il Palio.Siena .it. 19 June 2012 रोजी पाहिले.