Jump to content

खाते उतारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खाते उतारा ही बँकग्राहकाच्या चालू खात्यातील सर्व व्यवहारांची नोंद होय. साधारणतः खाते उतारा एक महिन्यासाठी दिला जातो.

भारतातील बँकांमध्ये ग्राहकाला दरमहा एक खाते उतारा मोफत दिला जातो. पण काही कारणाने एकापेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर त्याबद्दल सेवा शुल्क द्यावे लागते. सध्या, नेट बँकिंग वापरणारे ग्राहक, संबंधीत बँकेच्या संकेतस्थळावरून आपणास हव्या त्या कालावधीचा उतारा अधिभारण करून घेऊ शकतात. यासाठी कोणतेही शुल्क देय नाही. पण, वेगवेगळ्या बँकामध्ये वेगवेगळी प्रथा प्रचलित आहे.

मालकीच्या जमिनीच्या बाबतीतील खाते उतारे

[संपादन]

हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी महसूल विभागातर्फे दिलेला शासकीय अभिलेख आहे. क्रमांक ७ व क्रमांक १२ ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत.