इटानगर
Appearance
इटानगर | |
भारतामधील शहर | |
इटानगर येथील "इटा किल्ला" |
|
देश | भारत |
राज्य | अरुणाचल प्रदेश |
जिल्हा | पापुम पारे |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,४६० फूट (७५० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३४,९७० |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
इटानगर ही भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इटानगर शहर अरुणाचल प्रदेशच्या दक्षिण भागात हिमालयाच्या पायथ्याशी वसले आहे. इ.स. २०११ साली इटानगरची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती.
राष्ट्रीय महामार्ग ५२ ए इटानगरला आसाम राज्यासोबत जोडतो. इटानगरजवळील नहरलगुन हे रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीमध्ये येते. रेल्वेद्वारे जोडले गेलेले इटानगर हे गुवाहाटी व अगरतला खालोखाल ईशान्य भारतातील केवळ तिसरे राजधानीचे शहर आहे. येथून गुवाहाटीसाठी रोज तर नवी दिल्लीसाठी आठवड्यातून एकदा गाड्या सुटतात.
बाह्य दुवे
[संपादन]- सरकारी संकेतस्थळ Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत